आज मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या आहेत
प्रा.अड एस ए पवार पाटील (वराचे वडील) Marriages Whatsapp Group Link
मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा
“मुलगा उच्च शिक्षित असावा, लाखो रुपयाचे पॅकेज असावेत, वेल settled असावा, स्वतःचे घर असावे, मुंबई पुण्यात नोकरी असावी, मुलगा एकटा असावा, जवळ आई वडील नको, 10 एकर शेती असावी( मुलगी शेतात जाणार नाही मग शेती कशाला ? ….. त धुडगूस घालायला ? ) …… भागातलाच मुलगा हवा अशा एक ना अनेक अपेक्षा आहेत.
अपेक्षा मुले पूर्ण करू शकत नाहीत
त्यामुळे मुलामुलींची लग्न जमणे कठीण होऊन बसले आहे आणि तसेच त्यांच्या सर्व अपेक्षा मुले पूर्ण करू शकत नाहीत कारण करोना काळात अनेकांच्या नोकर्या गेल्यात आणि आता त्या मिळविण्यासाठी ते धडपडत आहेत नवीन नोकर भरती नाही.अनेक चांगल्या नोकरी देणार्या कंपन्या आपल्या कपाळ करंट्या राजकारण्यानी परप्रांतात पाठविल्यात नवीण्णांचा तर विषयच सोडा. आत्ताच एका सर्वेनुसार 2200 मुलांमागे 923 मुली शिक्षित आणि उपवर आहेत आणि ती मुले “या अपेक्षित मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या” अपेक्षांना नाही उतरू शकत किंवा त्यांच्या यक्ष प्रश्नांची उत्तरे नाही देऊ शकत. मग मुलामुलींची लग्न कशी व कशी होणार ? असे करत करत त्या मुली आज 35- 40 च्या वयात आहेत मग त्या कधी संसार थाटणार ? कधी आपण नातवंडाची तोंड पाहणार ?
5 वर्षापासुन लगने जमलेली नाहीत
मी स्वतः हा अनेक विवाह संस्थेशी आणि विवाह घडवून आणणाऱ्या धडपडणाऱ्या ग्रुपशी संलग्न आहे. गेल्या 5 वर्षापासुन पाहतो आहे की अनेक मुलींचे बायोडाटे रोज सगळ्या ग्रुपवर टाकूनसुद्धा आणि आजसुद्धा त्यांची लगने जमलेली नाहीत. त्या कारणांची पालकांनी विचारमंथन करण्याची गरज आहे. पण करतोय कोण ? जो तो ‘इगो’ मध्ये आहे.मुली कमी आहेत मग मुले वाले येतील नाक घासत. धड मुलांच्या पालकांशी व्यवस्थित बोलायलाही तयार नाहीत. बोलायच्या आधीच ‘ मुलाला पॅकेज किती आहे ? स्वतःचे मुंबई पुण्यात घर आहे का ? …एकर शेती आहे का ? असे नानाविध प्रश्न करून आपली जबान बंद करतात. माझा एक मित्राची फॅमिली सुशिक्षित आहे. स्वतः मुख्याध्यापक आहे. मुलगा शिक्षक आहे. रहायला शहरात आणि गावी घर आहे पण शेती नाही म्हणुन त्या शिक्षक मुलाचे लग्न जमत नाही.तो म्हणाला सर मी शहरातील घर विकून शेती घेतो म्हणजे लग्न जमेल त्याला मी म्हटले सर तस करू नका मग ते विचारतील तुम्हाला शहरात घर आहे का?तर मग काय सांगणा?
निष्कर्ष
वरील सर्व उदघोषित ‘अपेक्षाना’ मी तंतोतंत उतरत असताना मला एका मुलीच्या पालकांने मुलीबद्दल किती लाख रुपये देणार? असा चक्क विचारणा केली ( सदर पालक उच्च शिक्षित आहे ) म्हणजेच मुलीचा सौदा करू इच्छितात.
म्हणुन माझी मुलींच्या सर्व पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी हवेत उडू नये, जरा जमिनीवर यावे, आपला काळ अठवावा, लग्न जमविण्यासाठी आता का कोणी मध्यस्ती करत नाही याचा गांभीर्याने विचार करावा.लग्न न होत असल्याने आत्ताच साक्रीचा ‘प्रताप’ आठवावा. घरदार संपत्ती पाहण्याऐवजी खानदान, वगरग, माणसे, होतकरू मुलगा पाहावा ज्याच्यात काहीतरी वेगळे आणि स्वतःचे करण्याची रग पाहावी, दिखावी नाही तर अंतर्गत गुण पाहावेत, मुलामुलींचे भविष्य पाहावे.ज्याच्या मनगटात जोर असेल तर तो आपल्या मुलीचा संसाराचा स्वर्ग बनवेल यात तिळमात्र शंका नाही. Maratha Soyrik
..………. बघा पटतेय का ? ……
काही चुकल्यास क्षमस्व प्रा.अड एस ए पवार पाटील